वास्तुशास्त्र म्हणजे काय ?


वास्तुशास्त्र म्हणजे काय ?


वास्तुशास्त्र म्हणजे काय ? :-  वास्तुशास्त्र म्हणजे  अध्यात्म + भौतिक + विज्ञान यांच्यातून निर्माण जालेल शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र . वास्तु बांधण्या संदर्भात काही प्राचीन सिद्धांत आहेत. त्या सिद्धांताचा वापर करून जे शास्त्र तयार झाले आहे तेच वास्तुशास्त्र.  पृथ्वी, जल,वायू,तेज आणि आकाश या पंच महाभूतांमधून वाहणारी ऊर्जा संपूर्ण वातावरणावर परिणाम करत असते तसेच मानवी शरीर हे सुद्धा पंच महाभूत निर्मित आहे म्हणून  त्या ऊर्जेचा विधायक उपयोग करून त्या वास्तुत राहणा-या व्यक्तीच्या भल्या साठी व्हावा, अशी रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. हे शास्त्र वैज्ञानिक आहे. हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य किंवा जादूटोणा नाही. स्पष्ट शब्दात दिलेली वैज्ञानिक उत्तरे आहेत. वास्तुची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तु वरही अवलंबून असते. ब्रह्मांड, नक्षत्रे, ग्रह असतील  सात्विक-तामसिक शक्ती असतील तर वास्तुशास्त्र  सुद्धा आहेच. आणि या सर्वांच समतोल राखून निर्माण केलेली वास्तु म्हणजे वास्तुशास्त्र .  .


वास्तु म्हणजे काय ? :- वास्तु म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सांगावे तर, छोटी जमीन, छप्पर, ४ भिंती , २ खिडक्या, १ मुख्य दरवाजा, आणि त्यात राहणारी आपली जिव्हाळ्याची नाती . या सर्वांनी  मिळून तयार होते वास्तु . आणि वास्तु, शास्त्रीय भाषेत अर्थ थोडक्यात पाहू - वास्तुचा शब्दश: अर्थ निवारा म्हणजेच निवास स्थान आहे. आणि वास्तुशास्त्र जल, पृथ्वी, वायु, अग्नि आणि  आकाश या पंच तत्वावर आधारित आहे . पंच तत्वांचा वास्तु मध्ये समतोल असेल तर आपल्या वास्तुत  सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो . ज्यांनी हि पृथ्वीची  रचना केली त्या विश्वकर्माच्या म्हणण्यांनुसार वास्तु शास्त्रा प्रमाणे वास्तु असेल तर घरात सुख, दुःख, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व गोष्टींची प्राप्ती मनुष्याला होते . आपण सर्वानी अयकले असेल कि "घर एक मंदिर आहे" याच मंदिरात सुख, शांती, मोठ्यांचं आदर त्यांचा आशीर्वाद , मुलांवर प्रेम , स्त्रियांना सन्मान आणि ईश्वराची नि-स्वार्थ पूजा होत असेल तर आपले घर नक्कीच एक मंदिर बनेल. आपण हिलेच असेल जगातील सात आश्चर्य दिल्लीतील ताजमहाल, पुण्यातील शनिवार वाडा, न्यूयॉर्कच वर्ल्डट्रेंड सेंटर या सर्व वास्तुची निर्मिती, पण या सर्वांना कोठे ना कोठे तरी डाग लागलं . असे का घडले असेल याचे आपण कधी विचारच केला नाही . असे पहिले गेले आहे कि जग भरात  ८०% डेव्हलपर (बिल्डर) हे वास्तुशास्त्राच्या अनुसार भवन निर्माण नाही करत, याच कारणाने वास्तुत अगणित वास्तुदोष निर्माण होतात . आणि याचे परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या व्यक्तीस होतात .


वास्तु दोष म्हणजे काय ? :-  माज्या आता पर्यंतच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक अभ्यासा वरून वास्तु दोष चार प्रकारचे आहेत. ते पुडील प्रमाणे......

१)     1) वास्तु निर्मित  दोष = वास्तु बांधताना किंवा भू-बाधित जमिनीवर बिल्डींग बांधताना पंच तत्वांचा, शास्त्राचा आधार न-घेता मुख्य दरवाजा, ब्रम्ह स्थान, स्वयंपाक घर, शयन गृह, बैठकीची रूम, टॉयलेट/बाथरूम (जे वास्तुत असू नये ) या सर्वांचा पंच तत्वांचा अभ्यास न-करता निर्माण केलेल्या वास्तु किंवा बिल्डींग म्हणजे वास्तु निर्मित‍ दोष . 

२)      2) वास्तुमध्ये व्यक्तीस्थापत्य दोष :- वास्तुमध्ये राहणारे व्यक्तींच्या चुकीची वागणूक, वाईट स्वभाव, वाईट कर्म, घरात होणारे सततचे वाद, स्त्रियांचे अनादर, वास्तुत राहणार्‍या व्यक्तींच्या चुकीच्या जागा, चुकीच्या स्थानात देवघर, चुकीच्या स्थानात तिजोरी आणि चुकीचा उंबरा याची रचना आणि वास्तुत घडलेल्या अ नैसर्गिक गोष्टी यांच्यामुळे वास्तुमध्ये व्यक्ती स्थापत्य दोष होतात .

३)      3) प्रारब्ध :- असं बोललं जात कि जन्म-मृत्यू याच चक्र चालूच असत , आणि याच चक्रव्यूह मधून मोक्ष प्राप्ती हेच आपलं धर्म आणि शास्त्र सांगत. पण आपण जिवंतपणे  कितीतरी इच्छाचं चक्र आपल्या भवती गुंतवतो, आणि मग याच इच्छा जिवंत असताना पूर्ण नाही जाळ्या कि  त्या अपूर्ण इच्छा पोटी  त्या अपूर्ण कर्म पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या योनित परत आपल्या कूर्मानुसार जन्म घ्यावं लागत . याच मागील जन्माचे पाप-पुण्य , इच्छा-आकांशा चुकीचे कूर्मानुसारच त्या त्या योनित नवीन जन्म घ्यावं लागत . यालाच प्रारब्धनुसार जन्म म्हणतात .

४)     4) जिओपेथिक स्ट्रेस :- सरळ आणि सोप्या भाषेत सांगावं तर भु-गरबात होणार्‍या प्रक्रिया. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तुत एक स्वताची ऊर्जा असते. हीच ऊर्जा जिओपेथिक  स्ट्रेसच कारण बनते. जियोपथिक स्ट्रेस वस्तुतवात भूगर्भात होणार्‍या नैसर्गिक व अ नैसर्गिक महाद्वीप किंवा लहान मोठ्या घर्षणाने, एकमेकांना आपटल्याने , भूकंप, लावा, आणि घाण पाण्याचा प्रवाहाने जिओपेथिक स्ट्रेस निर्माण होतात. भु-गरबात होणार्‍या जिओपेथिक स्ट्रेसमुळे पृथ्वीवर वायुमंडळात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या मुळे महाभयंकर शारीरिक व्याधी होते. यालाच जिओपेथिक स्ट्रेस म्हणतात

7

गुम