Posts

Showing posts from April, 2023

वास्तुशास्त्र म्हणजे काय ?

वास्तुशास्त्र म्हणजे काय  ? वास्तुशास्त्र म्हणजे काय ? :-   वास्तुशास्त्र म्हणजे  अध्यात्म + भौतिक + विज्ञान यांच्यातून निर्माण जालेल शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र . वास्तु बांधण्या संदर्भात काही प्राचीन सिद्धांत आहेत. त्या सिद्धांताचा वापर करून जे शास्त्र तयार झाले आहे तेच वास्तुशास्त्र.  पृथ्वी , जल , वायू , तेज आणि आकाश या पंच महाभूतांमधून वाहणारी ऊर्जा संपूर्ण वातावरणावर परिणाम करत असते तसेच मानवी शरीर हे सुद्धा पंच महाभूत निर्मित आहे म्हणून  त्या ऊर्जेचा विधायक उपयोग करून त्या वास्तुत राहणा-या व्यक्तीच्या भल्या साठी व्हावा , अशी रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. हे शास्त्र वैज्ञानिक आहे. हे शास्त्र म्हणजे कुठले रहस्य किंवा जादूटोणा नाही. स्पष्ट शब्दात दिलेली वैज्ञानिक उत्तरे आहेत. वास्तुची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव , सुख दुःख हे सगळे वास्तु वरही अवलंबून असते. ब्रह्मांड , नक्षत्रे , ग्रह असतील  सात्विक-तामसिक शक्ती  असतील तर वास्तुशास्त्र   सुद्धा आहेच. आणि या सर्वांच समतोल...